Sunday, July 3, 2016

पहिल्या 'मराठी ट्विटरकट्टा' निमित्ताने!


ट्विटरवर रंगला पहिल्यांदाच 'मराठी ट्विटरकट्टा'

माहिती तंत्रज्ञान व इंटरनेटच्या या आधुनिक काळात माहितीचा प्रसार आणि संवाद करण्यास  उपयोगी म्हणून जगभर अनेक सोसिअल साईट्स चा उदय झाला आहे आणि अजून होतच आहे.या सर्व माध्यमांचा वापर करून आज माणूस घरी बसून दूरवरच्या गोष्टींपासून अवगत होतो. बहुतांश वेळी अशा सोसिअल नेटवर्कचा मूख्य वापर हा वैयक्तिक संवाद आणि बातमी प्रसारासाठी होतो. मात्र आता याच सोसिअल साईट्स मधील एक, जगविख्यात 'ट्विटर'चा वापर आपली मराठी माणसे काही वेगळ्या व यशस्वी पद्धतीने करत आली आहेत आणि यावेळी अशाच एका अभूतपूर्व कार्यासाठी ट्विटरचा वापर केला आहे.
ट्विटर हे फक्त एक खाजगी संवादाचे व वैयक्तिक विरंगुळ्याचेच साधन नाही तर ते एक समाज आणि आपल्या समाजातील लोकांना एकमेकांस जोडणारे साधन आहे आणि हेच सिद्ध करून दाखवलंय मराठी माणसाने दि.२७/०६/२०१६ ला मातृभाषेतील पहिला 'ट्विटरकट्टा' आयोजित करून.
प्रत्येकाच्या आयुष्यात हि ईच्छा असते कि एकदातरी आपण आपल्या आवडत्या सेलिब्रेटी सोबत भेट घ्यावी किंवा प्रत्यक्ष संवाद साधावा. पण हे सहजासहजी प्रत्येकालाच शक्य होत नाही म्हणूनच  मराठी ट्विटरकरांनी 'ट्विटरकट्टा' कल्पना साकार केली ज्यातून प्रत्येकाला पलीकडील माणसासोबत थेट चर्चा आणि संवाद साधता येईल.
२७/०६/२०१६  या दिवशी पार पडलेला पहिला  ट्विटरकट्टा जमला तो रेडिओ सिटी पुणेच्या प्रसिद्ध आर.जे. 'शो शो शोनाली' म्हणजेच 'आर. जे. शोनाली' यांच्यासोबत. या ट्विटरकट्टा द्वारे बहुतांश मराठी- अमराठी अशा सगळ्यांच ट्विटरकरांना त्यांच्याशी चर्चा करता आली, मनात असलेले प्रश्न विचारण्यात आले. आर.जे. शोनाली याच्या आवडीनिवडीपासून तर कार्यक्षेत्रपर्यंतच्या गोष्टी जनतेने जाणून घेतल्या.
ट्विटरकट्टाचा उत्साह इतका शिगेला पोहचला होता कि एक तासाचा ट्विटरकट्टा तब्बल तीन तास चालला. यात 800 पेक्षा अधिक प्रश्न विचारले गेलेत तर 'ट्विटरकट्टा' हा ट्रेंडही भारताच्या ट्रेंडिंगमध्ये झळकला. मराठी माणूस एक झाल्यावर काय करू शकतो याचे हे मूर्तीमंत उदाहरणच जणू.  सेलिब्रिटीसह नॉन सेलिब्रिटीनाही संधी देणारा व
व मराठी माणसाशी नाळ जोडणारा दुवा
म्हणजे 'ट्विटरकट्टा' अशी आता याची ख्याती निर्माण झाली आहे. या ट्विटरकट्टाचे आयोजन प्रसिद्ध मराठी वस्तुनिष्ठ हँडल मराठी विश्वपैलू (@marathibrain) यांनी केले होते, तर मराठी रिट्विट, रावा ग्रुप, मराठी विचारधन आणि इतर मराठी वस्तुनिष्ठ हॅन्डल्सचा यात सक्रिय सहभाग मिळाला. या पहिल्याच ट्विटरकट्टयाच्या यशाचे श्रेय जाते ते आयोजक, सामाजिक मराठी हॅन्डल्स आणि मराठी - अमराठी अशा प्रत्येक लोकांना.
यापुढेही दर आठवड्याला आयोजित होणाऱ्या या ट्विटरकट्यात सिनेमा, क्रीडा, साहित्य, संगीत, समाजकार्य अशा विविध क्षेत्रातील सामान्य- असामान्य अशा लोकांना आमंत्रित करून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आयोजकांनी सर्वाना हे आवाहन केले आहे कि मराठी ट्विटरकरांनी या ट्विटरकट्टयास नक्की भेट द्यावी आणि आनंद द्विगुणित करावा. पहिल्या ट्विटरकट्टयात शोनाली यांनी दिलेल्या उत्तरांना #ट्विटरकट्टा व #AskRjShonali या टॅगवरून शोधता येईल.

Follow me on twitter:- मराठी भारतीय @sbisensagar

No comments:

Post a Comment