Thursday, May 5, 2016

एकटेपणाला दूर करण्याचा रामबाण उपाय!

तुम्ही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम, गूगल प्लस, हाईक, मीट मी, हँगआऊट, टंब्लर, आणि इतर खूपशा अशा सोसिअल प्लँटफॉर्म वर असंख्य पोस्ट टाकत असाल, व्यस्त राहत असाल, कितीही सोसिअल असाल पण जर तुम्हाला अपेक्षित माणसाकडून, तुमच्या लोकांकडून  कुणी तुम्हाला 'तू कसा आहेस? कुठे आहेस?' अशी साधी विचारपुसही करत नसेल तर सोसिअल होण्यात काही अर्थ नाहीये. याचा अर्थ म्हणजे तुम्ही एकटे आहात, तुमच्यासोबत माणसे जुडली आहेत मात्र ती तुमच्या जवळ नाहीत. मग हा एकटेपणा माणसाला खातो, तुम्हाला निरस्त करतो, त्रस्त करतो,.एकटेपणा जाणवतो आणि म्हणून यात गुरफटण्यापेक्षा एकटेही जगायला शिकावं माणसाने.
आपल्याकडे अशा गोष्टी बाळगाव्या, असे छंद जोपासावे जेणेकरून कुणी सोबत नसतानाही तुम्हाला एकटेपणा जाणवणार नाही, वेळ वाया जाणार नाही. असे छंद जोपासा, अशी आवड ठेवा ज्यासोबत तुम्ही आपला वेळ घालवू शकाल, सदुपयोग म्हणून, विरंगुळा म्हणून वापर करू शकला.
माझ्या निरीक्षणानुसार खुपदा लोकांच्या नैराश्याला एकटेपणा कारणीभूत असतो. शेवटी इतरांकडून काही अपेक्षा बाळगण्यापेक्षा, या व्यस्ततेच्या जगात कुणाला आपलं म्हणवून घेण्यापेक्षा, कुणी आपल्यासोबत आपला वेळ घालवले अशी खोटी अपेक्षा बाळगण्यापेक्षा स्वतः जगा, एकटे जगा पण खुशाल जगा. आणि या एकटेपणाला दूर सारण्याचा एकच रामबाण उपाय म्हणजे तुमचा आवडता विषय निवडा, क्षेत्र निवडा, त्यात मोकळा वेळ घालवा, आवडीनिवडी तयार करा, छंद जोपासा. माझ्याकडे छंद आहेत, सततचे कार्य आहेत, त्यात मी रमतो, कला जोपासतो म्हणून एकटा असल्यावरही मी कुणाला बोलण्यापर्यंतची वेळ येऊ देत नाही. सर्व आपल्यांत रमले असतात, मग आपणही आपल्यात रमायचं.
इतरांसाठी नाहीतरी तुम्हाला स्वतःला , तुमच्या स्वतःच्या मनाला सुखद अनुभव देईल अशा गोष्टी करा, नक्कीच तुम्हाला एकटेपणा जाणवणार नाही, आणि जाणवला तरी तो आता तसा नसेल जो लोकांच्या आपल्यासोबत नसल्याने जाणवत होता.
आनंदी राहा! व्यक्त व्हा! अडचणी शेयर करा! काही लोक अजूनही आहेत तुमच्यासाठी, त्यांना समज येईल तेव्हा येतील सोबत तुमच्या मात्र तोपर्यंत स्वतः जगा, आनंदाने खुशाल जगा!

©सागर बिसेन
०५/०५/२०१६